Slide Background

आमच्या विषयी

कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन १९८६ पासून कार्यरत असून आज त्याचे कार्यक्षेत्र ५ जिल्ह्यात पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूपासून ते तळ कोकणातील देवगड, सावंतवाडी इथपर्यंत सुमारे ७०० कि.मी. पसरलेल्या २६ सहकारी बँका असोसिएशनच्या सभासद आहेत. त्यात ७ शेडूल्ड / मल्टीस्टेट दर्जाच्या बँका आहेत. असोसिएशन कर्मचार्‍यांसाठी तसेच संचालक मंडळ, सदस्य बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण यांसारखे विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करते. असोसिएशन बँक संचालकांसाठी अभ्यास दौरे, बँकिंग संबंधित कार्यशाळा, बँक कर्मचारी, कार्यकारी अधिकारी इत्यादींसाठी विविध सेमिनार आयोजित करते. सभासद बँक कर्मचाऱ्याच्या कला / क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी असोसिएशन वेळोवेळी क्रीडा आणि सांस्कृतिक विभागीय स्पर्धा जिल्हावार आयोजित करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असोसिएशनचा मुख्य जोर सभासद बँकांना बँकिंग संबंधित बाबींवर आवश्यक सहाय्य आणि मार्गदर्शन प्रदान करणे हा आहे. अशा रीतीने कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन सभासद बँक व रिझर्व बँक यांना जोडणारा दुवा आहे. तसेच, सहकार खात्याशी संबधित बाबीसाठीही सभासद बँकांना असोसिएशन मदत करते.

सार्थ कोकण ई-बुक

घडामोडी

प्रेस नोट

Share this Story
Players researching real-money gaming platforms can explore the available categories at aud777 and compare the platform with other options before registering. Review deposit methods, payout conditions and promotional requirements in full. Use only money reserved for leisure and end your session once your personal spending or time limit is reached.